आपला पासवर्ड ठेवा सुरक्षित

आपला पासवर्ड ठेवा सुरक्षित

**हॅकिंग म्हणजे दुसर्‍याच्या संगणक/मोबाइल यंत्रामधून त्यांना न समजता संगणकीय पद्धतीने केलेली चोरी!
जर आपणास या हैकिंग पासून दूर राहायचे असेल तर सर्वात प्रथम आपला पासवर्ड भक्कम हवा. आपला पासवर्ड कसा असावा/ठेवावा  त्याबाबत आज आपण सविस्तर माहिती पाहुया.........

🔵🔵 पासवर्ड ठेवा : ही अकाऊंट सुरक्षित करण्याची पहिली पायरी. आपला पासवर्ड जितका किचकट असेल तिततीच अकाऊंट हॅक होण्याची शक्यता कमी होते. पासवर्डसाठी शक्यतो आपले नाव किंवा आपल्या संबंधित गोष्टींचा वापर करू नये. काही अंक(9,5,3,2), काही अक्षरे(a,A,B,Z,q,r)आणि सोबतच काही विशेष चिन्हांचा(!,@,&,+_) वापर करावाच! आणि पासवर्डची लांबीसुद्धा बर्‍यापैकी लांब असावी (आठ किंवा अधिकचा वापर करा व कॅपिटल, स्मॉल दोन्ही अक्षरे आणि ते सुद्धा Alphanumeric पद्धतीने वापरा. आतातर तुम्ही मराठी अक्षरेसुद्धा वापरू शकता. )


🔵🔵काही उदाहरणे, “Soorajb&439=”,”swapB@9325!”,”sume5480#P!”, “अबक%Gmail982”,   “8934@NeerB=”,”kaus$FB6534अ” (उदाहरणासाठीच असून यांचाच वापर करावा असे नाही तुमच्या कल्पनेने मिश्रण करून योग्य आणि सुरक्षित असा पासवर्ड बनवा)

पासवर्डसाठी तुम्ही 0-9 अंक, a-z अक्षरे, !”#$%&'()*+,-./:;<=>?@[\]^_`{|}~ यापैकी चिन्हे वापरू शकता

तुम्हाला ज्यावेळी Security Question सेट करून त्याचं उत्तर ठरवायला विचारलं जाईल (उदा. What is the name of your first school?, What is your birthplace ? What is your mother’s name?,इ.) त्यावेळी त्याचं उत्तर मुद्दाम खोटं द्या कारण त्याच खरं उत्तर तुमच्या ओळखीच्या व्यक्तींना माहीत असण्याची शक्यता असते आणि ते तुमचं अकाऊंट हॅक करू शकतात !!! (मात्र उत्तर खोट असलं तरी लक्षात राहिलं पाहिजे.

📱📲Two Step Verification

2 Step Verification : ही अकाऊंट सुरक्षित करण्याची सर्वात सोपी आणि सर्वात उपायकारक पद्धत आहे. यामध्ये आपण आपला यूजरनेम आणि पासवर्ड टाकल्यावर आपल्याला एक नवं पेज दिसतं ज्यावर कोड टाकायचा असतो जो आपल्या फोन नंबरवर SMS द्वारे येतो ! यामुळेच याला 2 पायर्‍यांचे संरक्षण म्हणतात. आपला फोन आणि त्यातील SMS केवळ आपल्याकडेच असल्यामुळे हॅक होण्याची शक्यता नसतेच !
यामुळे जरी हॅकरला तुमचा पासवर्ड माहीत असला तरी त्याला काही करता येणार नाही त्याला तुमच्या फोनवरील SMS ची गरज पडेल! याचाच अर्थ ही पद्धत अकाऊंट सुरक्षित करण्याची दृष्टीने सर्वात सोपी आहे! 

गूगलवर 2 स्टेप व्हेरिफिकेशनसाठी लिंक : “ http://ift.tt/29aVqgH  > Get Started ” फेसबुकवर 2 स्टेप व्हेरिफिकेशनसाठी ” Settings > Security > Login Approvals  > Edit“(काही जणांना हा पर्याय दिसणार नाही) ट्वीटरवर 2 स्टेप व्हेरिफिकेशनसाठी ” Settings > Require a verification code when I sign in > add a phone ”  

📲📲 अकाऊंटच्या सुरक्षिततेसाठी : तुमचं गूगल अकाऊंट हे फक्त गूगल किंवा जीमेल पुरतं मर्यादित नसून तेच अकाऊंट गूगलच्या सर्वच सर्विससाठी वापरलं जातं(उदा. यूट्यूब, प्लेस्टोअर, गूगल प्लस, ड्राइव, मॅप्स, कॅलेंडर, फोटोज, इ.) त्यामुळे ह्या अकाऊंटला सुरक्षित बनवणं भागच आहे. तरीसुद्धा बरेच जण याकडे दुर्लक्ष करतात! “माय अकाऊंट” या पेजवर गूगलने सर्वच गोष्टी आणून ठेवल्या आहेत ज्यामुळे सिक्युरिटी, प्रायवसी,सर्च अशा सगळ्या सेटिंग ह्याच पानावर बदलता येतात. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सर्च करत असलेल्या  गोष्टी गूगलने साठवू नयेत तर ती सोयसुद्धा आहे. समजा तुमचा फोन हरवला तर त्या फोनमधून गूगल प्ले Logout करण्यासाठी सोय आहे!  आधी सर्च पुसून टाकणे, सर्च हिस्टरी थांबवणे, अॅक्टिविटी पाहणे, भाषा पसंती, सिक्युरिटी/प्रायवसी इ. बदल इथेच करता येतात!  

🔗🔗गूगलच्या अकाऊंटसाठी सर्वात महत्वाची लिंक :myaccount.google.com 

No comments:

Post a Comment

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS