🎯RSS feed आणि गुगल रीडर

 अभिजीत वैद्य
जर तुम्ही इंटरनेट वापरत असाल आणि बरेच ब्लॉग्स, वेबसाईट्स वाचत असाल, तर त्या त्या साईटवर नवीन माहिती आली आहे की नाही हे बघण्यासाठी तुम्ही काय करता ?

साईट्स बुकमार्क्स करून प्रत्येक वेळी सर्व साईट्स उघडून बघणे हा एक पर्याय आहे. पण त्याचे बरेच तोटे आहेत. एका संगणकाच्या browser वर सेव्ह केलेले बुकमार्क्स तुम्हाला दुसऱ्या संगणकावर पाहता येत नाहीत. बरेचसे ब्लॉग्स अनियमितपणे अपडेट्स होतात. त्यामुळे एखादी साईट उघडल्यावर जुनीच पोस्ट दिसण्याचा प्रकार बरेचदा दिसतो. इंटरनेटचा स्पीड कमी असल्यास वेळ आणि bandwidth दोन्ही वाया जाते.

दुसरा पर्याय म्हणजे इमेलद्वारा सबस्क्रीप्शन. हा एका चांगला पर्याय असला तरी याचेही काही तोटे आहेत. एक म्हणजे तुम्ही वाचत असलेल्या सगळ्याच साईट्सवर हा पर्याय असतो असे नाही. आणि बरेचदा अश्या ठिकाणी मेलआयडी दिल्यावर स्पॅममेल्सच जास्त येण्याची शक्यता असते.

तिसरा पर्याय म्हणजे आर.एस.एस. फीड द्वारा अपडेट्स मिळवणे.

RSS (Really Simple Syndication) हा वेबसाईट कडून अपडेट्स मिळवण्याचा एक format आहे. तुम्ही साईटच्या RSS feeds ला सबस्क्राइब केले की तुम्हाला प्रत्येक वेळी साईटवर जाऊन अपडेट्स बघण्याची गरज नाही. साईटवर जेंव्हा नवीन पोस्ट्स येतील तेंव्हा ते अपडेट्स तुम्हाला तुमच्या RSS feed reader मध्ये मिळतील. RSS reader मधून तुम्ही सबस्क्राइब केलेल्या सर्व साईट्स चे अपडेट्स एकाच User interface मध्ये दिसतात. त्यामुळे एकाद्या ब्लॉगवरील फॉंट अथवा background कलर आवडत नसेल तरी काही फरक पडत नाही.

गुगल रीडर हि गुगलची RSS feed reader ची सर्व्हिस आहे. गुगल च्या account ने तुम्ही यावर लॉग-इन करू शकता. लॉग-इन केल्यावर डाव्या बाजूला असलेल्या “Add Subscription” मध्ये तुम्हाला हव्या असलेल्या साईटची URL टाकले की झाले. त्या साईटवर होणारे सगळे अपडेट्स तुम्हाला गुगर रीडर वर कळवण्यात येतील. गुगल रीडरवर नवीन फीड्स शोधण्याचीसुद्धा सोय आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयाचे नवीन ब्लॉग्स, साईट्स शोधू शकता.
_______________________

No comments:

Post a Comment

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS