windows 8 मधे start मेनू तयार करा.


        ✳ *संगणक tricks*✳

 *Windows 8 मधे Start Menu तयार करा.*

_⬇ *मायक्रोसॉफ्ट ने विंडोज 8 मध्ये स्टार्ट मेनू काढून टाकला आहे. मायक्रोसॉफ्ट प्रोग्रॅम मॅनेजर यांच्या म्हणण्याप्रमाणे बहुतांश युजर्झ हे प्रोग्रॅम्स टास्कबार ला पिन करुन ठेवतात आणि स्टार्ट मेनूचा वापर करण्याऐवजी टास्कबार वरील शॉर्टकटला क्लिक करतात. टास्कबार चा असा वापर वाढल्याने तो स्टार्ट मेनू मधून काढून टाकण्यात आला. पण अजुनही ब-याच जणांना स्टार्ट मेनूची चांगलीच सवय झाली आहे, त्यांच्यासाठी स्टार्ट मेनू परत आणण्यासाठी काही सॉफ्टवेयर्स आहेत.त्यापैकी एकाची आज आपण माहिती पाहू.....*_

      💾  1⃣ *Pokki* 💾

*Pokki*  _हे सॉफ्टवेअर विंडोज 8 मध्ये स्टार्ट मेनू सोबत काही अॅप्लीकेशन सुध्दा पुरवते. तुम्हाला येथे programs, files, control panel आणि power option दिसतात. तसेच येथे search आणि favorites organization ची सुद्धा  सोय आहे._

   *आपणास  pokki हे सॉफ्टवेयर डाउनलोड करावयाचे असल्यास खालील लिंकवर क्लीक करा.*

    http://www.pokki.com/windows-8-start-menu

💾 2⃣ *Stardock*💾

हे सॉफ्टवेअर चे ट्रायल वर्जन आहे .आपण ते डाऊनलोड करु शकता.

*वैशिष्टे :*

 _येथे विंडोज 8 स्टाईल मध्ये मेनू दिसतात._
_स्टार्टमेनू मध्ये डेस्कटॉप आणि इतर अॅप्स पिन करु शकतो._ _Jump list ला support करतो._
_येथे अॅप्स, सेटींग्ज आणि फाईल शोधू शकतो._
_सरळ विंडोज 8 डेस्कटॉप ने बुट करु शकतो._
_एका क्लिक ने shut down, devices, music, documents आणि videos access करता येतात_
_*हे सॉफ्टवेयर डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.*_

http://www.stardock.com/products/start8/

No comments:

Post a Comment

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS