चला एक्सेल शिकुया....

चला मायक्रोसॉफ्ट एक्सेल शिकुया........



         💻💻चला एक्सेल शिकुया......

📝📝संगणकाच्या कीबोर्ड वर बारा function keys चा    एक्सेलमध्ये  shortcut म्हणून वापर .........

🔘F1HELP / मदत  चा शॉर्टकट

🔘F2सिलेक्ट केलेल्या सेल मध्ये EDIT करण्यासाठी (Double click)

🔘F3फॉर्म्युला ठरावीक नावांच्या सहाय्याने मांडणे

🔘F4शेवटची Command वा Action पुन्हा करणे

🔘F5 go to Dialogue box चा शॉर्टकट

🔘F6 विंडोमधील प्रत्येक भागामध्ये जाण्याकरीता

🔘F7स्पेलींग तपासण्याकरीता शॉर्टकट

🔘F8एकापेक्षा अधिक cells सिलेक्ट करण्याकरीता

🔘F9फॉर्म्युला व त्यामधील किंमती तपासण्याकरीता

🔘F10मेनुबार मधील विविध पर्याय निवडण्याकरीता

🔘F11Column type chart बनविण्याकरीता

🔘F12"Save As" Dialogue box चा शॉर्टकट

    
एक्सेलशीट ओपन करण्यासाठी Start --> All Pragrams --> Microsoft Office --> Microsoft Excel 2010 असा मार्ग वापरावा.

आता तुमच्यासमोर बर्‍याच उभ्या आडव्या रेषा आणि त्यांपासून बनलेले अनेक चौकोन दिसत असतील. हीच एक्सेल शीट.


१) Name Box - या ठिकाणी; सद्यस्थितीला कर्सर कोणत्या Cell मध्ये आहे ते समजते.

२) Formula Bar - फॉर्म्यूला बारमध्ये Cell मध्ये असलेला नंबर किंवा माहिती किंवा जे असेल ते दिसते. वरील स्क्रीनशॉटमध्ये Cell L9 मध्ये असलेला स्टँडर्ड डेव्हीएशन चा फॉर्म्यूला दिसत आहे.

३) Quick Access Toolbar - या टूलबार मध्ये आपल्याला हवे असणारे महत्वाचे शॉर्टकट्स साठवून ठेवता येतात व हवे त्या वेळी लगेचच वापरता येतात.

४) Column Name - एक्सेल शीटवर दिसणारे A, B, C पासून XFD पर्यंत दिसणारे उभे चौकोन म्हणजे Columns आहेत.

५) Ribbon Menu and Tabs - रिबन मेन्यू २००७ व्हर्जन पासून अस्तित्वात आला. २००७ च्या आधिच्या एक्सेलमध्ये एखाद्या फंक्शनपर्यंत पोहोचण्यासाठी बराच क्लिकक्लिकाट करायला लागायचा. तो टाळण्यासाठी २००७ पासून या प्रकारचा मेन्यू डिझाईन केला गेला.

६) Workbook Name - सध्या वापरात असलेले वर्कबूक कोणते आहे ते इथून ओळखता येते.

७) Row Number - एक्सेल शीटवर दिसणारे १, २, ३ पासून १०,४८,५७६ पर्यंत दिसणारे आडवे चौकोन म्हणजे Rows आहेत.

८) Cell - सद्यस्थितीला कर्सर कोणत्या चौकोनात आहे तो चौकोन म्हणजे Cell.
Column चे नाव आणि Row चा नंबर मिळून Cell Reference तयार होतो. (या उदाहरणार L9)

९) Vertical Scrollbar - एक्सेलशीटमध्ये उभे; वरखाली स्क्रोल करण्यासाठी हा स्क्रोलबार वापरतात.

१०) Range - ज्यावेळी आपण एकावेळी दोन किंवा त्यापेक्षा जास्ती Cells सिलेक्ट करतो त्यावेळी तो Cell समुह म्हनजेच रेंज.

११) Worksheet Name - Excel Workbook मध्ये असलेल्या वेगवेगळ्या Excel Sheet चे नाव इथे वाचता येते.

१२) Range Stats - आपण माऊसच्या सहाय्याने सर्वच्या सर्व नंबर्स सिलेक्ट केले असतील तर सिलेक्ट केलेल्या आकड्यांच्या संबंधीत पुढील गोष्टी विनासायास या ठिकाणी समजतात.
अ‍ॅव्हरेज, आकड्यांची संख्या, लहान आकडा (Minimum within Range), मोठा आकडा (Maximum within Range), आकड्यांची बेरीज.

१३) Horizontal Scrollbar - एक्सेलशीटमध्ये आडवे; डावीकडून उजवीकडे स्क्रोल करण्यासाठी हा स्क्रोलबार वापरतात.

१४) Page View - सध्या एक्सेल शीट कोणत्या फॉरमॅटमध्ये दिसत आहेत ती इथे कळते. तसेच एक्सेल शीट 'पेज लेआऊट' आणि 'पेजब्रेक' फॉरमॅटमधून बघता येते.

१५) Zoom - एक्सेल शीट ची झूम लेव्हल किती आहे ते इथे कळते.






6 comments:

picasion.com

एकूण ब्लॉगभेटी

ONLINE USERS